कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून: स्वराज

Sushma Swaraj
Sushma Swaraj

नवी दिल्ली : साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून, भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो आज (रविवार) सकाळी साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली. ख्रिश्चन धर्मीयांचा सण ईस्टर संडेलाच तीन चर्चसह सहा ठिकाणी झालेल्या स्फोटात 52 जणांचा मृत्यू झाला असून, 300 हून अधिक जण जखमी आहेत. आज सकाळी स्थानिक वेळेनुसार 8.45 मिनिटांनी हे स्फोट घडवून आणण्यात आले. 3 चर्च आणि 3 पंचतारांकित ह़ॉटेलमध्ये हे स्फोट घडविण्यात आले.

सुषमा स्वराज यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मी सतत कोलंबोतील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. तेथील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भारतीय नागरिकांनी माहितीसाठी  +94777903082, +94112422788, +94777902082, +94772234176, +94112422789 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com