मी मोदींवर नाराज नाही; अजूनही एनडीएमध्येच : नितीशकुमार

मी मोदींवर नाराज नाही; अजूनही एनडीएमध्येच : नितीशकुमार

नवी दिल्ली : स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल झालेल्या भाजपप्रणित 'एनडीए'च्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपूर्वीच घटकपक्षांतून नाराजीचे सूर उमटू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने नकार दिल्यानंतर यासंदर्भातील चर्चा सुरू झाल्या. पण 'या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही', असे खुद्द नितीशकुमार यांनीच आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.

मोदी यांच्यासह ५७ खासदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 'जेडीयू'च्या एकाही मंत्र्याचा समावेश नव्हता. भाजपने 'जेडीयू'ला एक मंत्रिपद देऊ केले होते. पण नितीशकुमार यांनी ते नाकारले. त्यावरून नितीशकुमार नाराज असल्याचे चित्र उभे राहिले होते.

यासंदर्भात नितीशकुमार म्हणाले, "मला भाजपकडून सांगण्यात आले, की आमच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळेल. त्यावेळी मी म्हटले, की मला त्याची गरज नाही; पण मी माझ्या सहकार्‍यांना विचारेन. मी सर्वांना विचारले. सर्वांचे मत असेच झाले, की मंत्रिमंडळात केवळ प्रतिकात्मक सहभाग असून फायदा नाही. त्यामुळे आम्ही ती ऑफर नाकारली. पण आम्ही नाराज नाही. आम्ही 'एनडीए'मध्येच आहोत.''

'जेडीयू'ने मोदी मंत्रिमंडळात तीन जागा मागितल्या होत्या, अशा आशयाचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. त्याचा संदर्भ देत नितीशकुमार म्हणाले, ''मी स्वत:हून एकही जागा मागितली नाही. हे वृत्त चुकीचे आहे. भाजपने स्वत:हून एक जागा देऊ केली होती.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com