आम्ही राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहतोय : कुमारस्वामी

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

काँग्रेसचे नेते आणि जेडीएसचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. यापूर्वी काँग्रेसनेच जाहीर केले की कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्य येईल. 

बंगळुरू : काँग्रेस आणि जनता दल (एस) आम्ही कोणतीही घाई करत नाही. आम्ही राज्यपालांकडून मिळणाऱ्या सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत, असे जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज (शनिवार) सांगितले. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली केल्या जात आहेत. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कुमारस्वामी यांनी सत्ता स्थापनेबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, आम्ही राज्यपालांकडून सरकार स्थापनेच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत.

तसेच त्यांना भविष्यातील राजकीय खेळीबाबत विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसचे नेते आणि जेडीएसचे नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. यापूर्वी काँग्रेसनेच जाहीर केले की कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्य येईल. 

Web Title: We are waiting for governors invite says JDS leader Kumaraswamy