आमच्याच कंपनीने केली अनिल अंबानींची निवड: दसॉल्ट सीईओ

Dassault CEO Eric Trappier
Dassault CEO Eric Trappier

नवी दिल्ली : राफेल करारासाठी दसॉल्ट कंपनीनेच अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली होती. आम्ही खोटे कधी बोलत नाही, असे स्पष्टीकरण दसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिले आहे.

राफेल करारावरून देशभर वादविवाद सुरु असताना दसॉल्ट कंपनीच्या सीईओंनीच हे स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राफेल करारप्रकरणी एएनआय या वृत्तवाहिनीने एरिक ट्रॅपियर यांची मुलाखत घेत या कराराची माहिती उघड केली आहे. यूपीए सरकारच्या काळात 126 विमानांच्या खरेदीसाठी 526 कोटी रुपये एवढी बोली लागली होती. मात्र, त्याला अंतिम स्वरुप देताना एनडीए सरकारच्या काळात ती किंमत 1670 कोटी एवढी झाली आहे. यावरून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत.

एरिक ट्रॅपियर म्हणाले, ''आम्ही खोटे कधी बोलत नाही. यापूर्वीही जे काही सांगितले होते, ते खरेच होते. खोटारडेपणा करण्याची आमची प्रतिमा नाही. सीईओ असताना तुम्ही खोटे बोलू शकत नाही. दसॉल्ट कंपनीने अंबानींच्या कंपनीसह 30 कंपन्यांबरोबर करार केला आहे. दसॉल्ट आणि रिलायन्स यांच्या भागीदारीबाबत राहुल गांधी खोटे बोलत आहेत. या करारात दोन्ही कंपन्यांचा 50-50 टक्के हिस्सा आहे. आम्ही रिलायन्समध्ये काही पैसा लावलेला नाही. दसॉल्टमधील कामगार आणि अभियंते कायम पुढे असतात. अनिल अंबानींना आम्ही स्वतः निवडले आहे. भारतीय हवाईदलही याचे समर्थन करत आहे, कारण त्यांना त्यांचे संरक्षण क्षेत्र मजबूत बनवायचे आहे.''

काँग्रेसबरोबर काम करण्याचा मोठा अनुभव असल्याचे सांगत एरिक म्हणाले, की भारताबरोबर आमचा पहिला करार 1953 मध्ये झाला होता, तेव्हा पंडिल जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यानंतर अनेक पंतप्रधानांच्या कालखंडात आम्ही भारताबरोबर काम केले आहे, कोणत्या पक्षाबरोबर नाही. भारत सरकार आणि वायुसेनेसाठी आम्ही संरक्षण उत्पादने पुरविणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 

राफेलची अखेर किंमत काय?
राफेलच्या करारावरून वाद होत असताना त्यांनी याबाबत स्पष्ट केले. ते म्हणाले, आता मिळत असलेली विमाने ही 9 टक्के स्वस्त आहेत. 36 विमानांची किंमत ही तेवढीच आहे, जी 18 विमानांसाठी निश्चित करण्यात आली होती. सरकारने ठरविलेल्या या किंमती आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com