...म्हणून मी दु:खी : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

''मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात भारताचा आर्थिक दर वाढला होता. मात्र, आता ही परिस्थिती नाही. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ज्या योजना, प्रकल्प आणले गेले. त्या योजना, प्रकल्प मोदी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दुर्लक्षित करत आहेत, त्यामुळे आज मी दु:खी आहे''.

- सोनिया गांधी, माजी अध्यक्षा, काँग्रेस

नवी दिल्ली : ''मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात भारताचा आर्थिक दर वाढला होता. मात्र, आता ही परिस्थिती नाही. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ज्या योजना, प्रकल्प आणले गेले. त्या योजना, प्रकल्प मोदी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दुर्लक्षित करत आहेत. त्यामुळे आज मी दु:खी आहे'', असे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशात सोनिया गांधी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आता देशात नव्या धड्याची सुरवात झाली आहे. जी काही आव्हाने समोर आहेत. त्या आव्हानांना आम्ही सामोरे जात आहोत. मात्र, ती आव्हाने सामान्य नाहीत. पक्षाचा विजय हा देशाचा विजय आहे. हा विजय तुम्हाआम्हा सर्वांचा विजय आहे. काँग्रेस ही राजकीय संकल्पना नाही. ही एक चळवळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचा भ्रष्टाचार पुराव्यासह आम्ही उघड करत आहोत. त्या पुढे म्हणाल्या, 40 वर्षांपूर्वी इंदिराजींनी चिकमगलूरमध्ये विजय प्राप्त केला. त्यानंतर पक्षाने असाच विजय मिळवला. तसेच जेव्हा मी सार्वजनिक क्षेत्रात पाऊल ठेवले. तेव्हा काय परिस्थिती होती, हे तुम्हासर्वांना माहिती आहे. मात्र, त्यानंतर मला समजले, की पक्ष कमकुवत बनत चालला आहे. 

दरम्यान, नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे सोनिया गांधींनी अभिनंदन केले असून, त्यांच्या भाषणानंतर सोनिया यांनी राहुल गांधी यांची गळाभेट घेतली.

Web Title: We exposing Corruption of PM Narendra Modi and their Relative People says Sonia Gandhi