गरिबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी- मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

कानपूर- "आमच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात गरीब लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या परिवर्तन यात्रेमध्ये कानपूर येथे ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. सरकार काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपविण्यावर भर देत असताना संसदेचे कामकाज बंद पाडणे आणि चर्चा होऊ न देणे हा विरोधी पक्षांचा अजेंडा आहे, असा आरोप त्यांनी केला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले...

  • जे बँकेच्या व्यवस्थापकांना विकत घेऊ शकतात अशा लोकांशी मला लढा द्यायचा आहे.
  • भ्रष्टाचार आणि काळा पैसा याचे वाईट परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीयांवर झाला आहे. 
  • भ्रष्ट लोकांना वाचविण्यासाठी घोषणा देणारे लोक आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. 
  • भ्रष्टाचार मूळापासून उखडून टाकण्यास सरकार उत्सूक 
  • संसद बंद पाडणे, चर्चा होऊ न देणे हा विरोधकांचा अजेंडा
  • ज्यावर चर्चा करायची त्या मुद्द्यांपासून ते दूर का पळत आहेत?
Web Title: we have been blessed by poor- pm modi