काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची भाजपची मागणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. तसेच, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा या दोघांनी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. तसेच, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा या दोघांनी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले.

भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील. भाजपानेही सरकारचे समर्थन मागे घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. 

यावेळी बोलताना, माधव यांनी स्पष्ट केले की, भारताची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. पीडीपी सोबत गेल्यावर दहशतवादी कारवाया वाढल्या. मुफ्ती सरकार दहशतवादावर तोडगा काढण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एन.एन. व्होरा हे जम्मू आणि काश्मीरचे विद्यमान राज्यपाल असून त्यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपत आहे.

Web Title: We Have Decided That The Reigns Of Power In The State Be Handed Over To The Governor Ram Madhav