पराभव मान्य; आघाडी कायम राहणार- अखिलेश

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मी सुद्धा पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर वक्तव्य करेल. राजकीय पक्षाने प्रश्न उपस्थित केला असेल, तर चौकशी व्हायला हवी.

लखनौ - उत्तर प्रदेशात झालेला पराभव आम्ही मान्य करतो. काँग्रेससोबत आघाडी केल्याचा आनंद आहे, दोन युवा नेते एकत्र आले. भविष्यातही ही आघाडी कायम राहिल, असे समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व काँग्रेस आघाडीला भाजपकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपने तिनशेपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. तर, सप आणि काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. या पराभवाची जबाबदारी अखिलेश यादव यांनी स्वीकारली आहे.

अखिलेश म्हणाले -

  • समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, निर्णय आम्ही स्वीकार करतो.
  • ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मी सुद्धा पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर वक्तव्य करेल.
  • राजकीय पक्षाने प्रश्न उपस्थित केला असेल, तर चौकशी व्हायला हवी.
  • काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचा आनंद आहे, दोन युवा नेते एकत्र आले. यापुढील काळातही एकत्र राहू.
  • उत्तर प्रदेशात विकास करण्याचे काम केले. नवे सरकार आणखी चांगले काम करेल अशी आशा आहे.
  • उत्तर प्रदेशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार असल्याने आम्हाला आनंद आहे. 
  • उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था चांगली होती. आता भाजपने सांगावे कोणत्या राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे.
  • राज्यातील जनतेने समाजवादी पक्षाला मदतच केली आहे.
  • समाजवादी पक्षाची सायकल ट्यूबलेस होती, त्यामुळे साईकलचे चाक पंक्चर होण्याचा प्रश्नच नाही.
  • नागरिकांना सांगून, फसवून मते मिळत नाहीत.
Web Title: We have profited from alliance with Congress: Akhilesh Yadav