कुलभूषण जाधवचा खटला आम्हीच जिंकू : पाक

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

''आमच्याकडे कुलभूषण जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे, की आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तान नक्कीच जिंकेल. आम्ही आमच्या रितीने हा खटला सुरुळीत चालविण्यासाठी प्रयत्न करत आहोत''. 

- शाह मेहमूद कुरेशी, परराष्ट्रमंत्री, पाकिस्तान

नवी दिल्ली : आम्हाला आशा आहे, की पाकिस्तान कुलभूषण जाधवप्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात नक्कीच जिंकेल, असा विश्वास पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला.  

भारताचे नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर कथित हेरगिरीचा आरोप करण्यात आला असून, या आरोपाखाली जाधव पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आता पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी कुलभूषण जाधवप्रकरणाचा खटला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात नक्कीच जिंकेल, असे स्पष्ट केले. 

याबाबत कुरेशी यांनी सांगितले, की ''आमच्याकडे कुलभूषण जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे, की आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तान नक्कीच जिंकेल. आम्ही आमच्या रितीने हा खटला सुरुळीत चालविण्यासाठी प्रयत्न करत आहोत''. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवप्रकरण खटल्याची सुनावणी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार असल्याने कुरेशी यांनी याबाबत वक्तव्य केले.

Web Title: We hopeful that country will win Kulbhushan Jadhav Case