Atal Bihari Vajpayee : आम्ही वाजपेयींसाठी प्रार्थना करतो : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आम्ही अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहोत,

- अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे. त्यावर आज (गुरुवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही आम्ही अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहोत, असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच केंद्रीय मंत्री आणि काही राजकीय नेत्यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. बुधवारी रात्री रुग्णालय प्रशासनाने याबाबत सांगितले, की वाजपेयी यांची प्रकृती मागील 24 तासांपासून खालावली आहे. मागील नऊ आठवड्यांपासून 'एम्स'मध्ये दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, ते सध्या वैद्यकीय यंत्रणेवर आहेत. याबाबतचे पत्रक रुग्णालय प्रशासनाने काल (बुधवार) रात्री 10 च्या सुमारास जारी केले. 

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो, असे सांगितले.

Web Title: We pray for Vajpayee says Rahul Gandhi