"गगनशक्ती'मधून आम्ही ताकद दाखवून दाखविली' 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

भारतीय हवाई दल हे कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असून, नुकत्याच झालेल्या "गगनशक्‍ती' या हवाई दलाच्या सरावातून आम्ही आमचे सामर्थ्य दाखवून दिले असल्याचे हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धानोआ यांनी सांगितले.
 

हैदराबाद - भारतीय हवाई दल हे कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असून, नुकत्याच झालेल्या "गगनशक्‍ती' या हवाई दलाच्या सरावातून आम्ही आमचे सामर्थ्य दाखवून दिले असल्याचे हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धानोआ यांनी सांगितले.

या हवाई सरावाची व्याप्ती भारताच्या सीमेपलीकडेदेखील होती. यामध्ये सर्वच आघाड्यांवर आम्ही आमचे सामर्थ्य तपासून पाहिल्याचे त्यांनी नमूद केले. ते दुंडीगल येथे "एअर फोर्स अकॅडमी'च्या दीक्षान्त संचलनामध्ये बोलत होते. संरक्षण क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हवाई दलाने आधुनिकीकरणाचा स्वीकार केला आहे. पारंपरिक पद्धतीने आमचा देश सध्या युद्ध करत नसला तरीसुद्धा आम्हाला आमच्या क्षमता वाढवाव्या लागतील, दहशतवादी आणि सायबर हल्ले, नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची क्षमता आमच्या हवाई दलाकडे आहे असेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: We showed strength through "Gagan Shakti"