मायावतींनी भाजप-संघावर केलेल्या टीकेला पाठिंबा: काँग्रेस

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - "भारतीय जनता पक्षा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मिळून राज्यघटना हिंदुत्वावर आधारित करीत आहेत. भारतासारख्या देशात हा अजेंडा गैरलागू आहे' असे म्हणत कॉंग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजप-संघावर केलेल्या टीकेला पाठिंबा दर्शविला आहे.

"डॉ., आंबेडकर यांनी देशातील राज्यघटनेची रचना धर्मनिपरक्षतेवर आधारित केली आहे. त्यात बदल करून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मिळून भारतीय राज्यघटना हिंदुत्वावर आधारित करीत आहे' अशा शब्दांत मायावती यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक व परिवर्तन स्थळी मंगळवारी आयोजित कार्यक्रमात मायावती बोलत होत्या.

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते ओम प्रकाश मिश्रा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना मायवतींना आमचा पाठिंबा आहे. "भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी भारतासारख्या देशात गैरलागू आहे. त्यामध्ये भारतीय लोकशाहीचा विचार केलेला नाही. मायावती यांनी भाजप-संघावर केलेल्या टीकेची मी समर्थन करतो', असे म्हणत मिश्रा यांनी मायवातींना पाठिंबा दर्शविला आहे. तर मायावतींनच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्या दलित आणि आंबेडकरांच्या नावाने पैसे गोळा करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

Web Title: We Support Mayawati : Congress