मगो पोटनिवडणूक लढविणार- ढवळीकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

गोव्यातील मांद्रे व शिरोडा या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत केंद्रीय समितीने घेतला आहे. शिरोडा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवार असेन तर शिरोडा मतदारसंघातील उमेदवार पोटनिवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यावर निश्चित केला जाईल. सरकारमध्ये असूनही ही पोटनिवडणूक पक्षांतर करणाऱ्यांविरोधात असून ती सरकार किंवा ठराविक पक्षाविरोधात नसल्याची माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी दिली.

गोवा - गोव्यातील मांद्रे व शिरोडा या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत केंद्रीय समितीने घेतला आहे. शिरोडा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवार असेन तर शिरोडा मतदारसंघातील उमेदवार पोटनिवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यावर निश्चित केला जाईल. सरकारमध्ये असूनही ही पोटनिवडणूक पक्षांतर करणाऱ्यांविरोधात असून ती सरकार किंवा ठराविक पक्षाविरोधात नसल्याची माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी दिली.

मांद्रे मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे व शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर यांना मगोमध्ये प्रवेश करण्यास लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी अपक्ष राहून निवडणूक लढविली तर त्यांना पाठिंबा देण्याबाबतचा विचार पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतजा जाईल. आजच्या बैठकीत शिरोड्यातून मी निवडणूक लढवावी यावर निर्णय झाला आहे.

पक्षांतरबंदीसाठी आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. मतदार पाच वर्षांसाठी आमदाराला निवडून देतात त्यामुळे पाच वर्षापूर्वीच पक्षांतर करणे योग्य नसून त्याला पक्षाचा विरोध आहे. म्हणूनच ही पोटनिवडणूक पक्षांतर केलेल्यांविरोधात लढवत असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: We will fight by pole elections Says Dhavalikar