दोषींना कठोर शासन करू - केजरीवाल

पीटीआय
सोमवार, 9 डिसेंबर 2019

इमारतीचा मालक ताब्यात
अनाज मंडीतील आग लागलेल्या इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेहान असे त्याचे नाव असून, त्याच्या विरोधात पोलिसांनी कलम ३०४ आणि २८५ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज घटनास्थळाला भेट दिल्यानंतर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे जाहीर केले. आगीच्या या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शासन करण्यात येईल, अशी घोषणाही केजरीवाल यांनी या वेळी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

आगीच्या दुर्घटनेची न्यायिक चौकशी करण्याचे आदेश दिल्लीचे महसूल मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिले असून, मध्य दिल्लीच्या जिल्हा न्यायदंडाधीकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 

कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची केजरीवाल यांनी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, ही अतिशय दुःखद घटना आहे. दिल्ली सरकारने या दुर्घटनेच्या न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत. आगीच्या घटनेचे कारण चौकशीनंतर समोर येईल. याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांना कठोर शासन करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will strictly punish the guilty arvind Kejriwal