मोदींकडून सत्ता खेचून घेऊ : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

''पंतप्रधान मोदींनी तुमच्याकडील पैसा काढून घेतला आणि तुमचा हा पैसा श्रीमंतांना दिला. त्यांनी देशाचे विभाजन केले आहे. 'गब्बर सिंग टॅक्स' (जीएसटी) लागू केला आहे. त्यांनी भारताची शक्ती काढून घेतली. त्यामुळे आता आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता काढून घेऊ''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : ''पंतप्रधान मोदींनी तुमच्याकडील पैसा काढून घेतला आणि तुमचा हा पैसा श्रीमंतांना दिला. त्यांनी देशाचे विभाजन केले आहे. 'गब्बर सिंग टॅक्स' (जीएसटी) लागू केला आहे. त्यांनी भारताची शक्ती काढून घेतली. त्यामुळे आता आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता काढून घेऊ'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज (बुधवार) निशाणा साधला.  

आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रचारसभा घेण्यात आली. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, ''आमचा पक्ष सत्तेत आल्यास रोजगार, तरुण, शेतकरी आणि तेलंगणातील लोकांना त्यांची सर्व देणी मिळतील. त्यांनी तुमच्याकडून पैसे काढून घेत भ्रष्ट लोकांच्या खिशात घातले. पण आम्ही या भ्रष्ट लोकांच्या खिशातील सर्व पैसे परत काढून तुम्हाला परत देणार आहोत''. तसेच ते पुढे म्हणाले, ''तेलंगणा एका कुटुंबानुसार चालणार नाही. हे राज्य लोकं, शेतकरी, तरूण आणि महिलांच्या नियमापासून चालणार आहे. तुमच्या या शक्तीने नव्या तेलंगणाची निर्मिती केली जाणार आहे''. 

दरम्यान, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांना भत्ता म्हणून दरमहा तीन हजार देण्यात येईल. तसेच अर्थसंकल्पातील 20 टक्के पैसा तरुणांच्या शिक्षणावर खर्च करण्यात येईल. तसेच राज्यात अनेक महाविद्यालये, संस्था आणि चांगल्या रुग्णालयांची उभारणी केली जाईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले. 

Web Title: We will take power from PM Modi says Congress President Rahul Gandhi