आम्ही विश्वासदर्शक ठरावास तयार : कुमारस्वामी

आम्ही विश्वासदर्शक ठरावास तयार : कुमारस्वामी

बंगळुरू : कर्नाटकातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नव्या घडामोडी होत आहेत. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता कुमारस्वामी यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याची घोषणा केली.

कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) बंडखोर आमदारांनी दिलेले राजीनामे आणि या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा वाद विधानसभा अध्यक्षांकडे गेला. तसेच याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर आता न्यायालयाने मंगळवारपर्यंत कर्नाटकच्या राजकीय परिस्थितीत कोणताही बदल न करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

दरम्यान, या आमदारांच्या राजीनाम्यांवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संधीचा राजकीय लाभ उठवण्यासाठी कुमारस्वामी पुढे आले असून, त्यांनी आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com