उत्तर प्रदेशमधील गुंडाराज संपवू: पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश राज्यामधील आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षास विजय मिळवून दिल्यास राज्यातील "गुंडाराज' संपविण्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) बहराईच येथील एका सभेमध्ये दिले. पंतप्रधान प्रत्यक्षात या सभेस उपस्थित राहु शकले नाहीत. येथील धुक्‍यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरु शकले नाही. परंतु त्यांनी दुरध्वनीद्वारे येथील श्रोत्यांशी संवाद साधला.

"आज उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज आहे. कायद्याचा मागमूस नसलेल्या या राज्यात प्रत्येकजण त्रस्त झाला आहे. गुंडांना थांबविणे पोलिसांनाही अशक्‍य झाले आहे. तेव्हा या राज्याची प्रगती साधावयाची असेल; तर आधी या गुंडांना समर्थन देणाऱ्यांना सत्तेमधून बाहेर फेकून द्यावयास हवे. आणि भाजप हे कार्य पूर्ण करेल,'' असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी काळ्या धनासंदर्भात बोलताना राज्यातील दोन महत्त्वपूर्ण राजकीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्षास लक्ष्य केले.

काळ्या धनाविरोधातील या लढ्यासंदर्भात हे दोन्ही राजकीय पक्ष अस्वस्थ का आहेत, अशी उपहासगर्भ विचारणा त्यांनी केली. ""सप आणि बसपच्या राजकीय भूमिकांमध्ये क्वचितच साम्य असते. मात्र सध्या काळ्या धनाविरोधातील लढ्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांत समान अस्वस्थता आहे. मला या अस्वस्थतेमागील कारण कळत नाही!,'' असा टोला पंतप्रधानांनी यावेळी बोलताना लगावला.

Web Title: We would end gundaraj' in UP, says Modi