शस्त्रांच्या बाजारात तेजी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती निवळली असली, तरीसुद्धा भारत आणि चीन या आशियाई महासत्तांप्रमाणेच अन्य देशांनीही त्यांच्या लष्करी खर्चामध्ये वाढ केली आहे. शस्त्रसंपदेवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताप्रमाणेच चीनचाही समावेश आहे.

नवी दिल्ली - जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती निवळली असली, तरीसुद्धा भारत आणि चीन या आशियाई महासत्तांप्रमाणेच अन्य देशांनीही त्यांच्या लष्करी खर्चामध्ये वाढ केली आहे. शस्त्रसंपदेवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताप्रमाणेच चीनचाही समावेश आहे. जागतिक पातळीवरील खर्चाशी याची तुलना करता या दोन्ही देशांच्या खर्चाचे प्रमाण साठ टक्के एवढे भरते. जागतिक संरक्षण खर्च 1.739 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर एवढा असल्याचे "स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट'ने म्हटले आहे.

हे देश आघाडीवर 
अमेरिका, चीन, सौदी अरेबिया, रशिया आणि चीन 

जागतिक पातळीवर 
1.739 ट्रिलीयन डॉलर 
(1.1 टक्के) 
लष्करी खर्चातील वाढ (2017) 

चीन 
228 अब्ज डॉलर 
(48 टक्के वाढ) 

भारत 
63.9 अब्ज डॉलर 
(5.5 टक्के वाढ) 

अमेरिका 
610 अब्ज डॉलर 
(2.7 टक्के वाढ) 

रशिया 
66.3 अब्ज डॉलर 
(20 टक्के घट) 

"नाटो'चे 29 सदस्य देश 
900 अब्ज डॉलर 
(जागतिक खरेदीतील वाटा 52 टक्के) 

Web Title: Weapons value increase in market