टोपी घातल्याने कोणी नेताजी होत नाही : शोभा डे

Wearing An Icons Trademark Topi Does Not Make You Netaji Shobha De Hits Out At Pm Narendra Modi
Wearing An Icons Trademark Topi Does Not Make You Netaji Shobha De Hits Out At Pm Narendra Modi

नवी दिल्ली : आझाद हिंद सेनेची टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही, असा चिमटा वादग्रस्त लेखिका शोभा डें यांनी पंतप्रधान नेरेंद्र मोदींना काढला आहे. 

रविवारी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात मोदींनी आझाद हिंद सेनेची टोपी परिधान केली होती. त्यावर टीका करताना शोभा डे यांनी आझाद हिंद सेनेची टोपी घातल्याने कोणीही नेताजी ठरत नाही, असे खोचक ट्विट करत मोदींवर टीका केली आहे.

शोभा डे यांच्या ट्विटनंतर नेटीझन्सनी त्यांच्यावर टीका केली. गांधीजींची टोपी परिधान करुन गांधी होता येते का? नेहरुंचं जॅकेट परिधान करुन नेहरु होता येते का? शोभा डे या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, अशी टीका काही युजर्सनी केली. शोभा डे यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली होती.

दरम्यान, आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला रविवारी (ता. 20) 75 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमीत्त लाल किल्यावर स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले. देशाचे स्वांतत्र्य हा नेताजींचा एकच हेतू होता, हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच येथे ध्वजारोहण केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com