चेरापुंजीत दिवसभरात ९७२ मि.मी पाऊस; जूनमधील पावसाचा विक्रम मोडला

जगातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेल्या चेरापुंजीत जूनमधील पावसाचा विक्रम दोन दिवसांतच मोडला
weather update 972 mm rainfall during the day in Cherrapunji
weather update 972 mm rainfall during the day in Cherrapunjisakal

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेल्या चेरापुंजीत जूनमधील पावसाचा विक्रम दोन दिवसांतच मोडला. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत चेरापुंजीत सुमारे ९७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा १९९५ पासून जूनमधील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे. तसेच १२२ वर्षांतील एका दिवसातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. दोन दिवसांपूर्वीच ८११ मि.मी. पाऊस पडला होता. हवामान खात्याने पावसाच्या नोंदी ठेवण्यास सुरवात केल्यापासून चेरापुंजीत नऊवेळा जूनमध्ये एकाच दिवसात ८०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

मेघालयातील ईस्ट खासी हिल्समध्ये असलेल्या चेरापुंजीत यंदा आतापर्यंत ४०८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चेरापुंजीत इतका पाऊस नेहमी पडत नाही. प्रत्येक वर्षी एक किंवा दोनवेळा दिवसाला ५०० ते ६०० मि.मी पडतो. मात्र, एकाच दिवसात ८०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस असामान्य घटना आहे. चेरापुंजीपासून हवाईमार्गे दहा कि.मी.वर असलेल्या मौसिनरामध्ये बुधवारी ७१० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. हा जूनमधील १९६६ पासूनचा सर्वाधिक पाऊस आहे. मौसिनराम भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.

चेरापुंजीत एवढा पाऊस का पडतोय?

काही दिवसांपासून चेरापुंजीच्या परिसरात हवामानाची द्रोणीय स्थिती कायम आहे. त्यातच, बंगालच्या उपसागरावरून मोसमी वरे मोठ्या प्रमाणावर बाष्प घेऊन येत आहेत. हे वारे खाई टेकड्यांना धडकत असल्यामुळे चेरापुंजीत अतिवृष्टी होत आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या प्रादेशिक केंद्राचे वैज्ञानिक सुनीत दास यांनी सांगितले. चेरापुंजीत आणखी एकदोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असून त्यानंतर मात्र पाऊस कमी होईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com