Weather Update: यंदा मान्सूनचं आगमन उशिराने; हवामान विभागाने वर्तवला अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

Weather Update: यंदा मान्सूनचं आगमन उशिराने; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

यंदा नैर्ऋत्य मान्सून चार जून रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केला. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून आहे. त्या तुलनेत तीन दिवस उशिरा मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. (Weather Update Monsoon Late 4 June 2023 Says Imd )

नैऋत्य मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवसांनी उशीर होऊन 4 जून रोजी +/-4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या अंदाजात म्हटले आहे.

यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा होणारे आगमन हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

‘एल निनो’ची स्थिती, हिंदू महासागरातील द्विध्रुव परिस्थिती आणि उत्तर गोलार्धात बर्फाचे आच्छादन कमी होण्याची शक्यता यांसारख्या कारणांमुळे यंदाच्या र्नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस झाला. विभागाच्या अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस सरासरीएवढा पडण्याची शक्यता सुमारे ३५ टक्के, सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता सुमारे २९ टक्के तर सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता केवळ ११ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :weather updates