सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी आज (गुरुवार) घेण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीनंतर काही तासांमध्येच सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. लोयाप्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर अर्ध्या तासांत ही वेबसाइट हॅक झाल्याचे समोर आले.

hack

न्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा आरोप करत त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर या सुनावणीच्या अर्ध्या तासानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट तब्बल दोन तास बंद आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञान तज्ज्ञांना यावर काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. 

Web Title: Website of Supreme Court have been hacked after Loya case verdict