लग्नात मटन नसल्याने वरपक्षाचा गोंधळ; वधूने दिला लग्नास नकार

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

विवाहसमारंभात मटनाची मेजवानी न देता केवळ शाकाहारी जेवण दिल्याने नाराज झालेल्या वरपक्षाकडील मंडळींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून वधूने स्वत:हून लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : विवाहसमारंभात मटनाची मेजवानी न देता केवळ शाकाहारी जेवण दिल्याने नाराज झालेल्या वरपक्षाकडील मंडळींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून वधूने स्वत:हून लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.

मुझफ्फरनगरमधील कुलहेडी गावात रिझवान नावाच्या व्यक्तीचा नगमाशी विवाह ठरला होता. विवाह समारंभात केवळ शाकाहारी जेवणच देण्यात आल्याने वराकडील मंडळी नाराज झाली. मेजवानीत मटन नसल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिस आणि स्थानिक पंचायतीच्या सदस्यांनी मध्यस्थी करत तडजोड करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अनेक विनवण्या केल्यानंतर वराकडील मंडळी लग्नास तयार झाली. मात्र, अशा प्रकारामुळे वधूने स्वत:च लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर एका व्यक्तीने वधूसोबत विवाह करण्याची तयारी दर्शविली आणि वधूही त्यास तयार झाली. या विवाहाला पंचायतीनेही मान्यता दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला असून येत्या बुधवारी ते विवाहबद्ध होणार आहेत.

'त्यांच्याकडून लग्न रद्द करण्यात आले. लग्न रद्द होऊ नये म्हणून अनेक तडजोडी करण्यात आल्या. आम्ही त्यांना हुंडाही दिला होता. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्या व्यक्तीशी कन्येचा विवाह लावण्याचा निर्णय घेतला', अशी माहिती वधूपित्याने दिली.

Web Title: Wedding called off over 'meatless menu', bride finds another groom