प.बंगाल: फेसबुक पोस्टवरून हिंसाचार; संचारबंदी लागू, इंटरनेट बंद

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

पश्‍चिम बंगालमधील 24 परगाना जिल्ह्यातील बदुरिया आणि बसीरहत परिसरात एका फेसबुक पोस्टवरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर तेथे आज (बुधवार) कलम 144 लागू करण्यात आला आहे.

बसीरहत (पश्‍चिम बंगाल) - पश्‍चिम बंगालमधील 24 परगाना जिल्ह्यातील बदुरिया आणि बसीरहत परिसरात एका फेसबुक पोस्टवरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर तेथे आज (बुधवार) कलम 144 लागू करण्यात आला आहे.

सोमवारी प. बंगालमधील 24 परगाना जिल्ह्यात एका धार्मिक वेबसाईटसंदर्भातील फेसबुक पोस्टवरून धार्मिक कलह निर्माण झाला. त्यातून बदुरिया, तेंतुलिया आणि गोलाबारी परिसरात काही दुकाने पेटवून देण्यात आली आणि काही घरांमध्ये घुसून लूटमार करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 400 निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत. दरम्यान आज (बुधवार) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे गृह मंत्रालयाने या संदर्भातील सविस्तर अहवाल मागविला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. तर ममता बॅनर्जी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: west bangal india news attached news facebook post