मुर्शिदाबाद बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 43

पीटीआय
बुधवार, 31 जानेवारी 2018

दुर्घटनाग्रस्त बसमधील पाच प्रवासी बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्याची विनंती नातेवाइकांनी केल्याने आजही शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. मात्र या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही

बेहरामपूर (पश्‍चिम बंगाल) - पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गोगरा कालव्यात बस कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 43 झाली आहे. शोधपथकाने बुधवारी आणखी काही मृतदेह पाण्याबाहेर काढले. हा अपघात सोमवारी (ता.29) झाला होता.

दुर्घटनाग्रस्त बसमधील पाच प्रवासी बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्याची विनंती नातेवाइकांनी केल्याने आजही शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. मात्र या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, असे जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 43 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आठ जखमींचा जीव वाचविण्यास यश आले आले आहे.

Web Title: west bengal accident