सत्ता कायम राहिल्यास मोफत लस - ममता बॅनर्जी

mamta-banerjee
mamta-banerjee

गोपीबल्लवपूर - पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. भाजप असो किंवा तृणमूल कॉंग्रेस असो, मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय घोषणांची बरसात करत आहेत. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी झारग्रामच्या सभेत सत्तेत आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस बंगालच्या नागरिकांना मोफत दिली जाईल, अशी घोषणा केली. आपण घरातच राहावे, अशी भाजपची इच्छा होती आणि आपल्याला दुखापत झाली, असा आरोपही त्यांनी केला.

कमी गर्दीमुळे शहा हतबल
ममता बॅनर्जी म्हणाल्या, की सभेला गर्दी कमी होत असल्याने अमित शहा हताश झाले आहेत. देश चालवण्याऐवजी ते कोलकता येथे येऊन बसले आहेत. तृणमूल कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी ते कारस्थान रचत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यांना काय हवंय. मला मारुन निवडणूक जिंकू असा जर ते विचार करत असतील ते चुकीचा विचार करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेशन, रोजगारांवर भर
कोलकता - तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज पक्षाचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला. मागील दहा वर्षांमध्ये पक्षाने केलेल्या कामांची उजळणी करताना त्यांनी पुढील शंभर दिवसांमध्ये राज्याला प्रगतीमध्ये देशात प्रथमस्थानी आणण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला आहे. राज्यातील ४७ लाख लोकांना नळातून पाणी पुरवठा करण्याबरोबरच दीड कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचे आश्‍वासन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वांनाच आर्थिक आधार
राज्यातील प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्नाची हमी राज्य सरकारने दिली असून यान्वये सर्वसाधारण श्रेणीतील १ कोटी ६ लाख लोकांना दरमहा पाचशे रुपये तर अनुसूचित जाती आणि जमाती गटातील जातींना एक हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत संबंधित कुटुंबाची प्रमुख असणाऱ्या महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, असे ममतांनी सांगितले.

अन्य आश्‍वासने

  • गरिबांना वार्षिक सहा हजारांची मदत करणार
  • दिल्लीच्या धर्तीवर प्रत्येक घरी रेशन योजना
  • विधवा महिलांना एक हजारांची मदत देणार
  • राज्यात दहा लाख एमएसएमई युनिट बसविणार
  • कन्याश्री, रुपश्री, स्वास्थ साथी योजना सुरू राहणार
  • विद्यार्थ्यांसाठी वेगळे क्रेडिट कार्ड
  • शेतकऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपयांची मदत

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com