esakal | ममता दीदींच्या 'M' फॅक्टरने काढली भाजपची हवा

बोलून बातमी शोधा

mamta banarjee

ममता दीदींच्या 'M' फॅक्टरने काढली भाजपची हवा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल आता समोर येत असून जवळपास कोणाची सत्ता येणार हेसुद्धा स्पष्ट झालं आहे. पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि देशाचं लक्ष लागून राहिलेली निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची. इथं बंगालमध्ये दहा वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जींविरोधात भाजपनं रणशिंग फुंकलं होतं. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून राज्यात प्रचारसभा आणि दौरे केले. मात्र तरीही ममता बॅनर्जी यांनी सत्ता कायम राखण्यामध्ये यश मिळवल्याचं दिसत आहे. 292 जागांपैकी तृणमूल काँग्रेस 205 जागांवर तर भाजप 84 जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर एका जागेवर लेफ्ट आणि इतर उमेदवारांनी 2 जागांवर आघाडी घेतली आहे. कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी बंगालमध्ये मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतरही ममता बॅनर्जी निवडणुकीत वरचढ ठरल्या. ममता बॅनर्जी यांची स्वत:ची प्रतिमा, प्रचारावेळी घेतलेल्या भूमिका यामुळे निवडणुकीत त्यांनी वेगळी छाप पाडली. नंदीग्राममध्ये तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदु अधिकारी यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्याची कामगिरी ममता बॅनर्जींनी केली होती.

बंगाल की बेटी

बंगालच्या निवडणुकीत चर्चा झाली ती फक्त ममता बॅनर्जी यांचीच. भाजपने त्यांचे देशातले दिग्गज नेते ममता दीदींची पराभवासाठी बंगालमध्ये प्रचारासाठी धाडले होते. मात्र इतके करूनही भाजपला बंगालमध्ये जादुई आकडा गाठता आला नाही. ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या जय श्रीराम या घोषणेला विरोध करताना थेट पंतप्रधान मोदींसमोर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी हिंदूद्वेषी असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र याला उत्तर देताना ममतादीदींनी व्यासपीठावरच चंडी पाठ केला. भाजपनं ममतांना मुस्लिमही म्हटलं. तेव्हा त्यांनी आपण ब्राह्मण आणि शांडिल्य गोत्राचं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रचारादरम्यान झालेल्या दुखापतीनंतरही ममतांनी प्रचार केला. व्हिलचेअरवरून केलेल्या प्रचाराने त्यांना सहानुभूती मिळाली. ममता बॅनर्जी यांनी मोदी, शहा यांना बाहेरचे म्हटलं तर स्वत: बंगाल की बेटी असल्याचं सांगितलं. लोकांनीही भाजपऐवजी बंगालच्या बेटीलाच निवडून दिलं.

हेही वाचा: Live: विजयानंतर ममतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

मतुआ समजाचा पाठिंबा

राज्यात 2 कोटी लोकंसख्या असलेल्या मतुआ समाजाचंही ममतांच्या विजयात मोठं योगदान आहे. मतदानादिवशी मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी याच समुदायाच्या मंदिरात पूजाही केली होती. मात्र याचा निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. मतुआ समाजाने भाजपला कौल न देता ममतादीदींवरच विश्वास दाखवल्याचं निकालातून दिसतं.

मुस्लिम मते ममतांच्या बाजुने

निवडणूक प्रचारात भाजप सातत्यानं मुस्लिम मुद्यावरून ममता बॅनर्जींवर टीका करत होते. तर ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांना एकत्र राहण्याचा संदेश दिला. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट शब्दात पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी भाजपला पाठिंबा द्यावा असं व्यसपीठावरूम म्हटलं होतं. भाजपला आशा होती की मुस्लिम मते ममतांच्या बाजूने गेल्यास हिंदूंची काही मते आपल्याकडे येतील. पण असं प्रत्यक्षात झालं नाही. राज्यात एमआयएमने सुद्धा ममतांविरोधात उमेदवार उतरवल्यानं मतांचं विभाजन होण्याची शक्यता होती. इथेही मतदारांनी ममतांच्या बाजूने निकाल दिल्याचं दिसतं.

हेही वाचा: Live : तमिळनाडूत द्रमुकची सत्ता; राज ठाकरेंच्या सदिच्छा

महिलांबाबतचा अंदाज चुकला

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची ठरली. बूथवरसुद्धा महिला बघायला मिळत होत्या. मतदानासाठी महिलांचा उत्साह पाहून भाजपला त्यांच्या उमेदवारांना मते मिळतील असं वाटत होतं. मात्र यातही भाजपचे अंदाज चुकले. गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत बूथवर महिलांच्या गर्दीचा फायदा भाजप आणि नितिश कुमार यांना झाला होता. यावेळी बंगालमध्ये असं घडलं नाही.