West Bengal: सत्तेत आल्यास राज्यात विधान परिषद स्थापन करणार; ममतीदीदींची घोषणा

mamata_banerjee
mamata_banerjee

West Bengal Assembly Elections 2021- सत्तेत आल्यास राज्यात विधान परिषद स्थापन करणार असल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तसेच पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीसाठी (West Begnal Assembly election 2021) तृणमूल काँग्रेसने (TMC) 291 जागांसाठी उमेदवारांची लिस्ट जारी केली आहे. यावेळी त्यांनी 100 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये 50 महिला आणि 42 मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. उत्तर बंगालमध्ये टीएमसीने तीन जागांवर कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee)  या यावेळी नंदीग्राममधून निवडणूक (Nandigram Assembly Seat)  लढणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भवानीपूर मतदारसंघातून सोभनदेब चटोपाध्याय निवडणूक लढवतील. सत्तेत आल्यास राज्यात विधान परिषद स्थापन करणार असल्याचं ममतादीदी म्हणाल्या आहेत. जे लोक या लिस्टमध्ये नाहीत, त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल. दार्जिलिंग, कलिम्पोंग आणि कुर्सियांग या तीन जागांवर आमचे मित्र निवडणूक लढवतील, असं त्यांनी सांगितलं आहे. 

आठ ठप्प्यात निवडणुका

पश्चिम बंगालमध्ये यावेळी 8 टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 294 जागा असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत  27 मार्च (33 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44 जागा), 17 एप्रिल (45 जागा), 26 एप्रिल (36 जागा), 29 एप्रिल (35 जागा) दिवशी निवडणुका होतील. निवडणुकीचा निकाल 2 मेला लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष आहे. 

दरम्यान, पुढील काही महिन्यात तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमधील लढत चुरशीची होण्याचे संकेत आहेत. मात्र, ओपेनियन पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी सरकार स्थापन करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपही चांगली कामगिरी करेल, असं सांगण्यात आलं आहे. पण, प्रत्यक्षात काय निकाल लागतो हे पाहावं लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com