'आता पश्चिम बंगालचे होणार बांगला'

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज(गुरुवार) राज्याचे नाव बदलण्यासाठी ठराव पास करण्यात आला आहे. आता पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्यात येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच हे नाव बदलण्यात येईल. बऱ्याच दिवसापासून राज्य सरकार याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. 

कोलकत्ता - पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज(गुरुवार) राज्याचे नाव बदलण्यासाठी ठराव पास करण्यात आला आहे. आता पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्यात येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच हे नाव बदलण्यात येईल. बऱ्याच दिवसापासून राज्य सरकार याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. 

यापूर्वी, केंद्र सरकारने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राज्याने इंग्रजी, हिंदी आणि बंगाली या तिन्ही भाषेत नांव बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, 2011 साली सत्तेत आल्यानंतर तृणमूल काँग्रेस सरकारने राज्याचे पश्चिम बंगाल हे नाव बदलून बंगाल हे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम बंगालचे नाव बदलण्यामागे प्रमुख कारण म्हणजे राज्याच्या बैठकांच्या यादीत इंग्रजी आद्यअक्षरानुसार पश्चिम बंगालचे नांव हे खूप खाली राहत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

Web Title: West Bengal Assembly passes resolution to change states name to Bangla, must now wait for Centres approval