भाजपची कमाल अन् चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले किम जोंग? VIDEO होतोय व्हायरल

XI JINPING AND KIM JONG
XI JINPING AND KIM JONG

कोलकाता - लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. चीनकडून सुरु असलेल्या कुरापतींचा विरोध म्हणून भारतात चीनचे राष्ट्रपती आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी चीनच्या राष्ट्रपतींचा पुतळ्याचा धींड काढली. तसंच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून या निषेधाच्या आंदोलनावेळी एक चूक घडली. 

भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलनावेळी माहितीच नव्हतं की पुतळा कोणाचा जाळायचा आहे. भाजप कार्यकर्त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांचा पुतळा जाळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपला ट्रोल केलं जात आहे. 

पुतळा जाळण्यासाठी एकत्र जमलेले आसनसोल दक्षिणचे भाजप अध्यक्ष गणेश म्हणाले की, आम्ही चीनच्या कृत्याचा विरोध करत आहे. लडाखमध्ये जे झालं त्याच्या विरोधात आम्ही ही रॅली काढली आहे. चीनचे पंतप्रधान किम जोंग यांचा पुतळा जाळणार आहे. लोकांना आवाहन आहे की त्यांनी चिनी वस्तूंचा वापर करू नये आणि स्वदेशीचा वापर करा. चीनला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न आपण करू असेही ते म्हणाले. 

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. सोमवारी झालेल्या या घटनेमध्ये दोन्हीकडचे जवान आमनेसामने आल्यावर एकमेकांना भिडले होते भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. यामध्ये चीनचे 43 सैनिक ठार झाले. चीनने मात्र त्यांच्या ठार झालेल्या सैनिकांचा आकडा सांगितलेला नाही तसंच तो स्वीकारलेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com