
स्थलांतरित कामगारांचा रोजगार बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना केंद्र सरकारने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
कोलकता - कोरोनाच्या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात गेलेल्या स्थलांतरित कामगारांचा रोजगार बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना केंद्र सरकारने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक मजुरांचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली असल्याने अशा मजूरांना मदत करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या पीएम केअर्स फंडमधून अशा कामगारांना मदत करता येऊ शकेल असेही त्यांनी यावेळी सुचवले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मजुरांचा रोजगार बुडाला असून ते आर्थिक अडचणींचा सामना करत असून मी केंद्र सरकारला विनंती करते की त्यांनी अशा कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत करावी.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल