तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेते, मंत्री व आमदारांनी पक्षनेतृत्व व राज्य सरकारविरुद्ध खुलेपणाने बोलण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आपली बाजू मांडली आहे.
कूचबिहार - भाजप नेते तृणमूल काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांवर पक्षांतर करून भाजपमध्ये येण्याची सक्ती करत आहे, असा आरोप प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. एका रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजप नेत्यांनी तृणमूलचे प्रदेशाध्यक्ष सुब्रात बक्षी यांना दूरध्वनी करून भाजपमध्ये येण्यास सांगितले. भाजपला कोणतेही राजकीय सौजन्य नाही. विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे तृणमूलच्या नेते, कार्यकर्त्यांवर पक्षांतराची सक्ती केली जात आहे. तृणमूलचा जुना काळच आमची खरी संपत्ती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही संघर्ष करू. भाजपचा पराभव करू, असेही त्या म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेते, मंत्री व आमदारांनी पक्षनेतृत्व व राज्य सरकारविरुद्ध खुलेपणाने बोलण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आपली बाजू मांडली आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा