मुख्यमंत्री राज्यपालांना म्हणाले, 'तू चीज बडी है मस्त मस्त'

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात वाद सुरू झाला होता. आता तो वाद शिगेला पोहोचला असून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप लावले आहेत. 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वाद हा सर्वश्रुत असतानाच आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. बंगालमधील विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत ममता बॅनर्जी आणि जगदीप धनखड यांच्यात वाद सुरू झाला होता. आता तो वाद शिगेला पोहोचला असून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप लावले आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ममतांनी माझ्यावर टीका केली आहे, असे म्हणत धनखड यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी ट्विटवरून हे पोस्ट शेअर करत ममता बॅनर्जींवर आरोप केले आहेत. राज्यपालांनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, मुख्यमंत्र्यांनी माझ्यासाठी 'तू चीज बडी है मस्त मस्त' असे शब्द वापरले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी एका बंगाली वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण वापरले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे नाव न घेता 'तू चीज बडी है मस्त मस्त' असे शब्द वापरल्याचे सांगितले. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

राज्यपाल म्हणतात की, मी त्यांच्या या 'तू चीज बडी है मस्त मस्त' या टिप्पणी वर उत्तर देऊ इच्छित नाही. मी त्यांच्या पदाचा मान राखतो. संविधान दिनादिवशी झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांबद्दल असे उद्गार काढल्याची माहिती आहे. पण राज्यपालांनी याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त केली व मी मुख्यमंत्र्यांच्या पदाचा आदर करतो, असे सांगितले.    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal CM Mamata Banerjee indirectly criticizes governor in incorrect manner