मी माझा जीव देईन पण.... ममतांचा बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee

कोलकाता : मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मी माझा जीव देईन पण भाजपला (BJP) बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. तुम्ही मला धमकावू शकता, माझ्या छातीवर बंदूक ठेवू शकता आणि तरीही मी अखंड बंगालसाठी लढत राहीन असे ममता यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) काही नेत्यांनी पश्चिम बंगालपासून वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. यावर ममता बॅनर्जी यांनी वरील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. (Mamata Banerjee Attack On BJP)

Mamata Banerjee
KK च्या मृत्यूला ममता बॅनर्जी सरकार जबाबदार; भाजपाचा दावा

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात “अलिप्ततावाद” वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप करून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर बंगालमधील सर्व समुदायांचे लोक अनेक दशकांपासून एकत्र राहत आहेत, परंतु भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप कधी गोरखालँडची मागणी करत आहे, तर कधी वेगळ्या उत्तर बंगालची मागणी करत आहे. गरज पडल्यास मी माझे रक्त सांडायला तयार आहे, पण राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com