प्रियकराशी चॅट करत तरुणीने केली 'लाईव्ह' आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय तरूणीचे नाव मौसमी मिस्त्री असून, ती बारावीत शिक्षण घेत होती. मौसमी सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरातील रहिवासी होती. तिने फेसबुक लाईव्हदरम्यानच गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एका 18 वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे त्या तरुणीने फेसबुकवर प्रियकराशी चॅट करत होती. त्यादरम्यान तिने आत्महत्या केली. इतकेच नाहीतर त्या तरूणीकडून संपूर्ण घटनेचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात आले. 

आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय तरूणीचे नाव मौसमी मिस्त्री असून, ती बारावीत शिक्षण घेत होती. मौसमी सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरातील रहिवासी होती. तिने फेसबुक लाईव्हदरम्यानच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घराच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. आत्महत्येदरम्यान ती एका व्यक्तीशी चॅट करत होती. चॅट करणारी व्यक्ती तिचा प्रियकर असल्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मौसमी मिस्त्री शनिवारी आपल्या प्रियकराला भेटून आली होती. त्याच्याशी भेट घेतल्यानंतर ती प्रचंड रागात होती. घरी आल्यावरही ती कोणाशीच बोलत नव्हती. तसेच तरूणी व तिच्या प्रियकरामध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी मौसमी मिस्त्रीने आत्महत्या करणार असल्याचे प्रियकराला सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर मौसमीने आत्महत्या केली.

Web Title: West Bengal Girl Commits Suicide After Argument With Boyfriend