भाजप आंदोलनास हिंसक वळण

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये पोचल्या असताना आज राज्यातील भाजपच्या आंदोलनास हिंसक वळण लागले.

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये पोचल्या असताना आज राज्यातील भाजपच्या आंदोलनास हिंसक वळण लागले.

भाजप कार्यकर्त्यांनी लाल बझारमधील पोलिस मुख्यालयापर्यंत एका मार्चचे आयोजन केले होते. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनांची मोडतोड करत त्यांना आग लावली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर स्फोटके आणि बॅरिकेड्‌स यांचा मारा केल्याचे सांगितले जाते. कार्यकर्त्यांच्या दगडफेकीमध्ये सार्वजनिक बसेसचे मोठे नुकसान झाले.

Web Title: west bengal kolkata bjp agitation violence