लस प्रमाणपत्रांवर 'ममता'च! पश्चिम बंगालने मोदींचा फोटो हटवला

लस प्रमाणपत्रांवर 'ममता'च! पश्चिम बंगालने मोदींचा फोटो हटवला

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये राज्य सरकारने कोरोनाप्रतिबंधक लस घेणाऱ्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्य सरकार उत्पादकांकडून थेट लशींची खरेदी करत असल्याने आम्ही लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटा वापरण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान देशाच्या अन्य भागांमध्ये लस घेतलेल्या ४५ च्या पुढील नागरिकांना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. (West Bengal new COVID19 vaccine certificates with CM Mamata Banerjee photo instead of PM Modi)

लस प्रमाणपत्रांवर 'ममता'च! पश्चिम बंगालने मोदींचा फोटो हटवला
वारीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील : अजित पवार

बंगालमध्ये मात्र लस घेणाऱ्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामध्ये नवे काहीही नाही. पंजाब, झारखंड आणि छत्तीसगडमध्येदेखील अशा पद्धताने लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे छापली जातात, असे तृणमूल नेते फिरहाद हकीम यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी मात्र राज्य सरकारच्या भूमिकेला तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे बांकुरा येथील खासदार डॉ. सुभाष सरकार म्हणाले की, ‘‘ तृणमूल काँग्रेस लसीकरणाच्या मुद्यावरून घाणेरडे राजकारण करत आहे. जगामध्ये केवळ पाचच असे देश आहेत जे स्वत ः लशींचे उत्पादन करू शकतात. भारताचा त्यामध्ये समावेश होतो. पंतप्रधान हे देशाचे पालक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण होते आहे, त्यामुळे त्यांच्या छायाचित्राला आक्षेप असण्याचे काही कारणच नव्हते.’’

लस प्रमाणपत्रांवर 'ममता'च! पश्चिम बंगालने मोदींचा फोटो हटवला
कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार खर्च करत नाही यासाठी राज्याला पैसे मोजावे लागत आहेत त्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रावर ममता बॅनर्जी यांचा फोटो छापणे योग्यच आहे. लसीकरणासंबंधीची सगळी माहिती ही प्रमाणपत्रावर आहे. यामध्ये लसीच्या बॅच क्रमांकासह कोविन नोंदणी क्रमांकाचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्र्याचा संदेश देखील त्यावर छापण्यात आला आहे.

- फिरहाद हकीम, गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com