West Bengal: मतदानादरम्यान संघर्ष, भाजप आमदाराने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal: मतदानादरम्यान संघर्ष, भाजप आमदाराने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप

West Bengal: मतदानादरम्यान संघर्ष, भाजप आमदाराने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. येथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यानंतर पोलिसांनी परिस्थिती ताब्यात घेतली आहे.

भाजप नेत्यांनी टीएमसीवर मतांमध्ये हेराफेरीचा आरोप केला आहे. भाजप आमदार लक्ष्मण घोरूई म्हणाले की, मतदान शांततेत सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र टीएमसी समर्थकांनी आमच्यावर हल्ला केला. ते म्हणाले की टीएमसी मतांची हेराफेरी करत आहे.

आसनसोल नगरपालिका पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. निवडणुकीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: West Bengal Voting For Asansol Municipal By Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West Bengalelection