पश्चिम मध्य रेल्वेची 4 स्थानकांवर कॅशलेस तिकीट सुविधा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

सुरवातीला PoS सुविधा फक्त आरक्षित तिकिटे आणि पार्सल बुकिंग काउंटरला उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच अनारक्षित तिकिटांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅशलेस व्यवहारांना उत्तेजन देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

भोपाळ- निश्‍चलनीकरणानंतर रोखरहित (कॅशलेस) व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पश्चिम मध्य रेल्वेने तिकिटे आणि पार्सल बुकिंगसाठी मध्यप्रदेशातील चार रेल्वे स्थानकांवर PoS (पॉइंट ऑफ सेल) यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. 

जबलपूर- मदनमहल आणि जबलपूर जंक्शन, तसेच भोपाळ येथील हबीबगंज आणि भोपाळ मुख्य स्थानक अशा एकूण चार स्थानकांवर पॉइंट ऑफ सेल यंत्रे सुरू करून देण्यात आली आहेत, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुरेंद्र यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

रेल्वे प्रशासनाने भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) सहकार्याने कार्ड स्वाइप करण्यासाठी ही यंत्रे पुरविण्यासाठी व्यवस्था सुरू केली आहे. 
सुरवातीला PoS सुविधा फक्त आरक्षित तिकिटे आणि पार्सल बुकिंग काउंटरला उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच अनारक्षित तिकिटांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅशलेस व्यवहारांना उत्तेजन देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: West Central Railway starts cashless transaction facility at 4 stations in MP