भाईजानवर लागलेल्या 500 कोटींचे काय?

गुरुवार, 5 एप्रिल 2018

'दबंग 3' व 'भारत' हे चित्रपट सलमानच्या होम प्रॉडक्शनचे आहेत. त्याच्या गुंतणूकीवरही मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. या शिवाय त्याच्या टिव्ही शो, लाईव्ह इव्हेंटवरही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो. त्यामुळे या आयोजकांनीही काळजी व्यक्त केला आहे. 

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, निलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांची आज जोधपूर न्यायालयात सुनावणी होती. सलनामला 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्याचबरोबर दहा हजार रूपयांचा दंड झाला आहे. या प्रकरणामुळे सलमानच्या आगामी चित्रपटांच्या गुंतवणूकी धोक्यात आल्याची चर्चा होत आहे. त्याच्यावर गुंतवलेले तब्बल 500 कोटी रूपये आता धोक्यात असल्याच्या चर्चा आहेत. सलमान हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरणारा अभिनेता असल्याने या प्रकरणामुळे त्याचे किती नुकसान होईल, याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 salman khan's sad face

सलमान ज्या निर्मात्यांशी व आयोजकांसोबत काम करत आहे, त्यांच्यावरही धोक्याचे सावट आहे. सलमान व सैफआली खान या दोघांवर प्रत्येकी 500 कोटीच्या जवळपास पैसे गुंतवण्यात आले आहेत. सैफ अली खानला निर्दोष जाहीर केल्यानंतर त्याच्या गुंतवणूकदारांनी जरा समाधान व्यक्त केले आहे, पण सलमानच्या गुंतवणूकदारांवर अजूनही चिंतेचे सावट आहे. 

सलनामच्या आगामी 'रेस 3', 'दबंग 3' व 'भारत' या चित्रपटांवर प्रेक्षकांचे लक्ष आहे. या निर्णयामुळे रेस 3 च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटींग काही काळ पुढे ढकलले होते. ते अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. पण या प्रकरणामुळे चित्रपटाला किती पसंती मिळेल याकडे सर्वांचे लक्ष असेल.

'दबंग 3' व 'भारत' हे चित्रपट सलमानच्या होम प्रॉडक्शनचे आहेत. त्याच्या गुंतणूकीवरही मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. या शिवाय त्याच्या टिव्ही शो, लाईव्ह इव्हेंटवरही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो. त्यामुळे या आयोजकांनीही काळजी व्यक्त केला आहे. 

'हिट अँड रन' प्रकरणी मुंबईतील त्याच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची अलोट गर्दी झाली होती. पण या वेळचा निकाल हा जोधपूरला असल्यामुळे त्याच्या घराबाहेर माध्यमे सोडून फारशी गर्दी नव्हती. काल रात्री त्याची बहिण अर्पिता व कतरिना कैफने त्याच्या सुटकेसाठी मुंबईतील सिद्धीविनायकाकडे साकडे घातले होते. संजय दत्तनंतर इतक्या मोठ्या प्रकरणात अडकलेला सलमान हा पहिलाच अभिनेता आहे. 

Web Title: what about 500 crores invest on salman khan