जम्मू-काश्‍मीरमध्ये काय घडले चोवीस तासांत

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम काढून टाकण्याची घोषणा करण्यापूर्वी काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षेच्या पातळीवर वेगवान घडामोडी झाल्या. ते जाणून घेऊ या. 

- श्रीनगरमध्ये जम्मूत सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कलम 144 लागू. सामान्य नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन. गटागटाने एकाचवेळी बाहेर पडण्यासही मनाई. 

- काश्‍मीर खोऱ्यात इंटरनेटवर बंदी. अगोदर मोबाईल सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर लॅंडलाइन सेवा देखील बंद करण्यात आली. काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा दलाला सॅटेलाइट फोनसेवा उपलब्ध.

- केवळ जम्मूत सीआरपीएफच्या 40 तुकड्या तैनात. यापूर्वी हजारो संख्येने सुरक्षा दलांची नेमणूक. 

- जम्मू-काश्‍मिरातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद. विद्यापीठाची सोमवारची परीक्षादेखील पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलली. 

- गेल्या चोवीस तासांत सहा हजारांहून अधिक पर्यटकांनी काश्‍मीर सोडले. सरकारच्या आदेशानुसार विमानसेवेच्या भाड्यात वाढ नाही. 

- माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, सज्जाद लोन यांना रात्री नजरकैदेत ठेवले. दोन्ही नेत्यांकडून नजरकैदेसंदर्भात ट्‌विट. काश्‍मीरमध्ये काय घडतंय, याबाबत माहिती देण्याचे नेत्याचे ट्‌विटरवरून आवाहन. 

- जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात बैठक. डीजीपी, मुख्य सचिवासह अन्य अधिकाऱ्यांकडून राज्याची माहिती घेतली. 

जम्मू-काश्‍मीरच्या स्थितीसंदर्भात दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटची बैठक. काश्‍मीर खोऱ्यासंदर्भात सोशल मीडियावर अफवांचा बाजार. अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे सरकारचे आवाहन. 

काश्‍मीर खोऱ्यातील कलम 35 अ किंवा कलम 370 संदर्भात सरकारकडून घोषणेची शक्‍यता. 

गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्यसभेत कलम 370 आणि 35 (अ) काढून टाकण्याची शिफारस. जम्मू काश्‍मीर आणि लडाख वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश केल्याची घोषणा. 

राज्यसभेत प्रचंड गदारोळ. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा शिफारशीला आक्षेप. भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप. 

बहुजन समाज पक्ष, बीजेडी, अण्णाद्रमुकचा पाठिंबा. कॉंग्रेस, डावे, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, एमडीएमकेचा विरोध 

पीडीपीचे खासदार फयाज अहमद मीर आणि नजीर अहमद लावे यांना सभागृहाबाहेर जाण्याचे राज्यसभेचे अध्यक्ष वेंकया नायडू यांचे निर्देश. दोघांकडून घटना फाडण्याचा प्रयत्न. 

शिफारसीला विरोध करताना पीडीपीच्या खासदारांनी स्वत:चे कपडे फाडले. विरोधी पक्षाकडून धरणे. सभागृहात मार्शलना पाचारण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Exactly happened in Jammu and Kashmir in last 24 hours