
केंद्रीय मंत्र्याच्या पोरानं 23 वर्षापूर्वी घडवलेलं जेसिका हत्याकांड माहितीये?
'नो वन किल्ड जेसिका' हा चित्रपट आपण पाहिला किंवा त्याबद्दल ऐकलं असेल. दिल्लीच्या एका बारमध्ये एका मॉडलेची केंद्रीय मंत्र्याच्या पोराकडून हत्या करण्यात आली होती. बारमध्ये काउंटरवर दारु न दिल्याच्या कारणावरुन मनु शर्मा नावाच्या या व्यक्तीने जेसिका लाल या तरुणीची हत्या केली होती. त्यानंतर मनु शर्माला पोलिसांनी अटक केली होती. याच सत्य कहाणीवर आधारित असलेला हा चित्रपट आणि त्याची रक्तरंजित कहाणी.
अटकेच्या तब्बल १७ वर्षानंतर मनु शर्मा या आरोपीची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. जेसिकाच्या हत्येला आज २३ वर्ष पूर्ण झाले आहेत. काय आहे हे प्रकरण पाहूया.
बरोबर २३ वर्षापूर्वीचा हा हत्याकांड. गोष्ट आहे ३० एप्रिल १९९९ ची. जेसिका लाल नावाची एक मॉडेल होती. आपलं घर चालवण्यासाठी ती मॉडेलिंग करता करता एका पबमध्ये पण काम करायची. २३ वर्षापूर्वी असंच ती पबमध्ये काम करत असताना मनु शर्मा नावाचा व्यक्ती पबमध्ये आला. रात्री उशीर झाला होता. पब बंद करण्याची वेळ आली होती. त्या व्यक्तीने जेसिकाला दारु मागितली. पण पब बंद करण्याची वेळ आली होती त्यामुळे तीने मनुला दारु देण्यास नकार दिला. त्यानंतर राग अनावर झालेल्या मनुने जेसिकावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

जेसिका लाल
या हत्येनंतर पोलिसांना मनु शर्माला दोषी ठरवत अटक केली होती. पण कोर्टाच्या कारवाईत न्यायालयाने पोलिसांचे पुरावे खोटे असल्याचं सांगत मनु शर्माची सुटका करण्यात आली होती. ही सुटका सहजासहजी होऊ शकली नाही कारण मनु शर्मा साधारण व्यक्ती नव्हता. तो होता एका केंद्रीय मंत्र्याचा पोरगा. मनु शर्मा नावाच्या व्यक्तीने निष्पाप जेसिकाची हत्या केली असतानासुद्धा आरोपीची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर लोकांनी आणि माध्यमांनी हे प्रकरणा उचलून धरलं होतं. मीडियाच्या आणि लोकांच्या दबावामुळे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली. त्यानंतर आरोपी मनु शर्मा याला गुन्हेगार ठरवत कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मनु शर्माला हत्येनंतर तब्बल ४ वर्षांनी परत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुमारे १७ वर्षाच्या शिक्षेनंतर २ जून २०२० मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. एका हत्येच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगाराची फक्त १७ वर्षाच्या शिक्षेनंतर परत सुटका करण्यात आली होती. हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटले असेल. पण मनु शर्मा हा आरोपी माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा होता.

Criminal Manu Sharma
मनु शर्मा याला तुरुंगातून सोडण्याच्या आधी जेसिकाची लहान बहिण सबरीना हीने म्हटलं होतं की, "आम्ही त्याला माफ केलं आहे. आता त्याला सोडलं तरी आमचा कसलाच आक्षेप नाही. आम्हाला विश्वास आहे की, तो जेलमध्ये चांगलं काम करत आहे. त्याने तुरुंगात १७ वर्षे काढली असून आता आमचा त्याच्यावरचा राग कमी झाला आहे." असं ती म्हणाली होती. त्यानंतर दोन वर्षाने मनु शर्मा याची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.

jessica lal and her sister
ही घटना त्यावेळी माध्यमात एवढी पसरली होती की, मंत्र्यांचा मुलगा असल्याने कोर्टाने त्याला निर्दोष जाहीर केल्याचे आरोप केले गेले होते. त्यानंतर लोकांच्या दबावाने हे प्रकरण पुन्हा चर्चेत येऊन कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणावर 'नो वन किल्ड जेसिका' नावाचा चित्रपटही आला होता.

Jessica Sharma
Web Title: What Is Jessica Lal Murder Case Manu Sharma Completed 23 Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..