चीन सीमेवर अभूतपूर्व तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य सज्ज झाले आहे. हेलिकॉप्टरच्या घिरट्या, लढाऊ विमानांची उड्डाणे, लष्करी वाहनांच्या रांगा दिसत आहेत. आशियातील या दोन बलदंड, अण्वस्त्रक्षम देशांमधील तणाव राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून कमी होण्याची दाट शक्यता आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मात्र, या निमित्ताने या दोन्ही देशांची आणि लष्करी दबावतंत्राच्या व ताकदीच्या बाबतीत या दोघांपेक्षाही सामर्थ्यवान असलेल्या आशियातील तिसऱ्या देशाच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केल्यास परिस्थितीचे आकलन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. अशा दबावाच्या युद्धतंत्रात ‘पुराना खिलाडी’ असलेला रशिया भारताचा मित्र आहे, ही जमेची बाजू मानता येईल. पाकिस्तानची ताकद कमी असली, तरी त्रास देण्याची क्षमता मोठी असल्याने आणि चीनने त्यांना पंखांखाली घेतले असल्याने त्यांचीही माहिती आवश्यक आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा