व्हॅलेंटाईनमुळेच बलात्कार, महिलांवर अत्याचार: संघ नेते

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

पाश्चिमात्य संस्कृतीमुळे व्हॅलेंटाईन डे सारख्या गोष्टी सुरु झाल्या. बलात्कार, महिलांवरील अत्याचारात वाढ आणि अनौरस मुले ही व्हॅलेंटाईन डे मुळे वाढत आहेत. भारतात प्रेम हे पवित्र आहे.

जयपूर - महिलांवर होत असलेल्या अत्याचार आणि बलात्कार हे फक्त व्हॅलेंटाईन डे मुळेच होत असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले आहे.

जयपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर इंद्रेश कुमार यांनी संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना बलात्काराबद्दल व्हॅलेंटाईन डे ला कारणीभूत ठरविले आहे. भारतात प्रेमाला पवित्र मानले जाते. पण, पाश्चात्य संस्कृतीमुळे याचे बाजारीकरण झाले आहे, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

इंद्रेश कुमार म्हणाले, की पाश्चिमात्य संस्कृतीमुळे व्हॅलेंटाईन डे सारख्या गोष्टी सुरु झाल्या. बलात्कार, महिलांवरील अत्याचारात वाढ आणि अनौरस मुले ही व्हॅलेंटाईन डे मुळे वाढत आहेत. भारतात प्रेम हे पवित्र आहे. त्यासाठी राधा-कृष्ण, लैला-मजनू आणि हिर-रांझा यांची उदाहरणे दिली जात होती. फक्त भारतातच नाही, तर जगभरात यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​
शेतकऱ्यांना संपवण्याचे सरकारचे धोरण - शरद पवार

'ईव्हीएम' हॅकेथॉन आज होणार
मेनका गांधी रुग्णालयात दाखल​ 

Web Title: What is the reason for rape? Valentine's day, says RSS leader Indresh Kumar