'त्या' व्हॉट्सअॅप पोस्टची जबाबदारी अॅडमिनची नाही

WhatsApp
WhatsApp

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक निर्णय व्हॉट्सअॅप ग्रूपच्या तमाम अॅडमिन मंडळींसाठी दिलासा देणारा आहे. ग्रुपवरील कोणत्याही मजकुरासाठी संबंधित अॅडमिन जबाबदार राहणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रूपवर जो मजकूर शेअर केला जातो त्यासाठी प्रथम अॅडमिनला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केल्याच्या घटना आपण पाहतो. मात्र, खोडसाळ ग्रूप मेंबर्स आणि त्यांनी ग्रूपवर शेअर केलेल्या पोस्टचे टेन्शन अॅडमिनने घेण्याची आता आवश्यकता नाही. याबाबतचा न्यायालयाचा निर्णय अॅडमिनसाठी दिलासादायक ठरणार आहे. 

न्यायाधीश राजीव सहाय एंडलाव यांनी एक अब्रुनुकसानीचा खटला रद्दबातल ठरविताना म्हटले आहे की, "मला हे समजत नाही की एखाद्या ग्रुप मेंबरने टाकलेल्या मजकुरामुळे झालेल्या बदनामीसाठी त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन कसा काय जबाबदार असू शकतो."
यासंदर्भात दोन राज्यांतील शासनानेव्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरासाठी अॅडमिन जबाबदार असल्याची भूमिका मांडली होती. 

दरम्यान, न्यायालयाने असे म्हटले आहे की, "ग्रुपवरील कोणत्याही मजकुराची सत्यता तपासणे हे ग्रुप अॅडमिनचे काम नाही. त्याला जबाबदार धरणे म्हणजे वृत्तपत्रातील अवमानकारक मजकुराला कागदनिर्मिती करणारे जबाबदार आहेत असे म्हणण्यासारखे आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com