एकमेकांना 20 वर्षांनी पाहिल्यानंतर रडतंच राहिले...

WhatsApp reunites man with family after 20 years at banglore
WhatsApp reunites man with family after 20 years at banglore

बंगळुरू: माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवरून अनेक मेसेजेस फिरत असतात. कधी अफवेचे तर कधी चांगले. अनेकदा एखादी व्यक्ती, बालके सापडल्याची छायाचित्र व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियाचे फायदे तेवढेच तोटे असून, व्हॉट्सऍपमुळे तब्बल 20 वर्षांनी पिता-पुत्राची भेट झाली आहे. एकमेकांना पाहिल्यानंतर दोघे कित्येकवेळ नुसते रडतच राहिले.

राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील झाब गाव येथील महावीर सिंह चौहान हे मुंबईत व्यवसाय करत होते. व्यवसायात त्यांना नुकसान झाले. 1998 साली ते कुटुंबियांपासून दुरावले. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, ते सापडले नाहीत. पोलिसांकडे तक्रारही केली, पण त्यांचा शोध लागला नाही. अखेर पाच वर्षानंतर शोध थांबला होता. महावीर हे गेल्या आठवड्यात कर्नाटकमधील डोड्डाबल्लापुरा येथे बेशुद्धावस्थेत सापडले. तिथे ते सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होते. बेशुद्धावस्थेत असलेल्या महावीर यांना रवी आणि किशोर कुमार या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा आजार गंभीर होता. महावीर हे विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत एवढीच माहिती मित्रांना होती.

रवी आणि किशोर कुमार यांनी महावीर यांचे छायाचित्र आणि ड्रायव्हिंग लायसनवरील माहिती व्हॉट्सअॅपवर शेअर करण्याचा निर्यण घेतला. त्यानंतर महावीर यांच्याबद्दल माहिती देणारे अनेक मेसेज आणि फोन कॉल्स त्यांना आले. मात्र, राजस्थानमधील एका गावातून आलेल्या फोनमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. तो फोन होता महावीर यांच्या मुलाचा. प्रद्युमन असे मुलाचे नाव. प्रद्युमन याने व्हॉट्सऍपवर आलेले छायाचित्र हे वडिलांचे असल्याचे ओळखले होते. वडिलांच्या मित्रांशी संपर्क साधल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी विमानाने बंगळुरूला दाखल झाला. बंगळूरमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महावीर यांना 20 वर्षानंतर पाहिल्यानंतर प्रद्युमनने वडिलांचे पाय धरले. एकमेकांना 20 वर्षांनी पाहिल्यानंतर दोघेही कित्येक वेळ रडतंच राहिले. यावेळी उपस्थितांच्याही डोळ्यांमधून आनंदाश्रू तरळले. यावेळी 'मी, आज माझ्या सर्व चुकांमधून मुक्त झालोय, मला घरी घेऊन जा, अशी विनंती त्यांनी मुलाकडे केली.''

महावीर यांना आठ भाषा बोलता येतात. कुटुबियांपासून दुरावल्यानंतर त्यांनी विविध नोकऱया केल्या. चालक, फोटो ग्राफर, सेल्समन, सुपरवाईजर पासून ते सुरक्षा रक्षकापर्यंत. बंगळूर येथे सध्या ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते, अशी माहिती महावीर यांचे मित्र गोवर्धन गिरी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com