'व्हॉटस्‌ऍप'ने मद्यपींना तारले 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

वाहतूक पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर यांनी मद्यपींवर कारवाईचे नियोजन केले होते. त्यासंदर्भात लेखी आदेशही त्यांनी जारी केला होता. कोणत्या तालुक्‍यात केव्हा, कुठे व किती अल्कोमीटरसह ही कारवाई होणार याचा उल्लेख त्या आदेशात होता. सायंकाळी सात ते रात्री 10 या वेळेत ही कारवाई होणार म्हणून मद्यपान करायचे असेल, तर रात्री 10 नंतर करा, म्हणजे पकडले जाणार नाही, असा सल्लाही व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून देण्यात येत होता.

पणजी : श्रावणात महिनाभर मद्यपान बंद राहण्याच्या शक्‍यतेने आजच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाईल, असे गृहीत धरून पोलिसांनी मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर संपूर्ण गोव्यात कारवाई करण्याची मोहीम आखली खरी, मात्र तिची माहिती व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून फुटली. कारवाई करताना दमछाक होऊ नये म्हणून ही माहिती पोलिसांनीच फोडल्याची चर्चा मात्र रंगली आहे. 

वाहतूक पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर यांनी मद्यपींवर कारवाईचे नियोजन केले होते. त्यासंदर्भात लेखी आदेशही त्यांनी जारी केला होता. कोणत्या तालुक्‍यात केव्हा, कुठे व किती अल्कोमीटरसह ही कारवाई होणार याचा उल्लेख त्या आदेशात होता. सायंकाळी सात ते रात्री 10 या वेळेत ही कारवाई होणार म्हणून मद्यपान करायचे असेल, तर रात्री 10 नंतर करा, म्हणजे पकडले जाणार नाही, असा सल्लाही व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून देण्यात येत होता.

पोलिस कारवाईसाठी थांबणारी ठिकाणे चुकवायची कशी यासाठी नव्या मार्गांचे मार्गदर्शनही काही उत्साही करत होते. दिवसभर या रात्रीच्या प्रस्तावित कारवाईची चर्चा रंगली होती. त्यातच काही जणांनी पोलिसांनाही श्रावण आहे, त्यामुळे त्यांनाही कारवाई करायचीच नव्हती, त्यामुळे त्यांनीच ही माहिती फोडल्याचा आरोप करणे सुरू केले आहे. कारवाई झाली की नाही हे सकाळी समजेल मात्र तोवर याची चर्चा मात्र राज्यभर होती.

Web Title: whatsapp use for drinkers in Goa

टॅग्स