१०६ वर्षाच्या आजींसाठी मुख्यमंत्र्यांनी थांबवला गाड्यांचा ताफा...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

दुपारची वेळ... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती. तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि थेट त्या महिलेपाशी गेले. रस्त्यावरच गप्पा रंगल्या. 
 

दुपारची वेळ... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती. तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि थेट त्या महिलेपाशी गेले. रस्त्यावरच गप्पा रंगल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेले एक व्यक्तिमत्व. सर्वसामान्यांची जाण आणि तळमळ याचा अनुभव त्यांनीही घेतलाय. त्यामुळे राज्याचे प्रतिनिधित्व करताना सर्वसामान्य हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली वाटचाल सुरु केली आहे. कालचा हा प्रकार सर्वांच्याच भुवया उंचावून गेला. दुपारी कार्यक्रम आटोपून १२. ३० वाजता ते साखळीत जात होते. तेवढ्यात बसची वाट पाहत असलेली वयोवृद्ध महिला त्यांना दिसली.

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते

मुख्यमंत्री थेट त्या महिलेपाशी गेले. आई कशा आहात, इथे का बसला आहात, असे विचारले, हाताला धरून तिला उठवले. बाबा कोण तू, असे महिलेने विचारताच, मुख्यमंत्र्यांनी 'हाव  भामय पुलावरचो दोतोर...' असे म्हटल्यावर तिने 'अरे बाबा तू तर माझो दोतोर...' म्हणून सांगितले. या १०६ वर्षीय महिलेचे नाव, लक्ष्मी सूर्या शेट! मुख्यमंत्री सावंत राजकारणात येण्यापूर्वी भामय, पाळी येथे दवाखाना चालवायचे. त्यावेळी तपासणीसाठी नित्यनेमे हि महिला त्यांच्याकडे यायची. आजही ती पाळी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. त्या आईचे आशीर्वाद घेऊन तिला घरी सोडण्याची व्यवस्था त्यांनी केली. हा विषय चर्चेचा बनला. 

संजय राऊत म्हणतात, जेवणाप्रमाणे यादी तयार आहे

दरम्यान, एका उच्च पदावर राहूनही आपल्या लोकांत मिसळणारा माणूस, अशी प्रमोद सावंत यांची ख्याती आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विचारांचा पगडा आणि त्यांच्या सहवासात वाढलेले हे व्यक्तिमत्व असल्याने मुख्यमंत्र्यांची लोकांप्रती असलेली दृढ आस्था आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When the Chief Minister talks to 106 year old woman on road