डोनाल्ड ट्रम्प लावणार होते मोदींचा 'दुसरा' विवाह

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा विवाह लावण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट अमेरिकी पॉलिटिकोनं अहवालाद्वारे केला आहे. ट्रम्प यांनी भारतीय अधिकाऱयांसोबत यासंदर्भात विचारणाही केली होती.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी मे 2017 मध्ये अमेरिकेच्या दौऱयावर गेले होते. ट्रम्प यांनी मोदींसदर्भातील सर्व माहिती घेतली. यावेळी मोदी पत्नीबरोबर न येता एकटे का अमेरिकेला येत आहेत, याबद्दल अधिकाऱयांना विचारणा केली. शिवाय, मोदी यांचा विवाह झाला आहे की नाही?, असा प्रश्नही अधिका-यांना विचारला होता.

'अधिकाऱयांनी ट्रम्प यांना दिलेल्या माहितीवेळी सांगितले की, मोदींचा विवाह झाला आहे. परंतु, ते पत्नीसोबत रहात नाहीत. त्यामुळे ते पत्नीला घेऊन अमेरिकेला येऊ शकत नाहीत. ट्रम्प यांना मोदी पत्नीसोबत रहात नसल्याचे समजल्यावर त्यांनी मोदी यांचा दुसरा विवाह लावून देऊ, असे अधिकाऱयांना सांगितले. ट्रम्प यांच्या प्रस्ताव ऐकून अधिकारीही अचंबित झाले. पण, काही क्षणातच ट्रम्प यांनी थट्टा-मस्करी करत असल्याचे अधिकाऱयांना सांगितले. परंतु, थट्टा-मस्करीत का असेना ट्रम्प यांनी मोदींचा दुसरा विवाह लावण्याची इच्छा व्यक्त केली होती,' असा दावा पोलिटिकोनं केला आहे.

Web Title: When donald Trump joked about playing match-maker for PM Modi