उबरचे संस्थापक व्हिसाविना भारतात

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

अमेरिका आणि भारतात तारीख लिहिण्याच्या पद्धतीत थोडा फरक असल्याने व्हिसावरील तारीख चुकीची वाचली गेली आणि हा गोंधळ झाल्याचे केलॅनिक यांनी आज निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आयोजित केलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.

नवी दिल्ली - ऑनलाइन टॅक्‍सीसेवा देणाऱ्या उबर या कंपनीचे सहसंस्थापक ट्रॅव्हिस केलॅनिक हे भारतात व्हिसा नसतानाही आले आणि अत्यंत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळाला. खुद्द केलॅनिक यांनीच आज एका कार्यक्रमात आपला हा "भयानक' अनुभव सांगितला.

केलॅनिक हे भारत सरकारने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रित पाहुणे आहेत. यासाठी ते गेल्या आठवड्यात बीजिंगवरून पहाटेच भारतात आले. येथे विमानतळावर आल्यावर त्यांना आपल्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठीचा योग्य व्हिसा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पहाटे अडीच वाजता केंद्रीय गृहसचिव आणि आयबीच्या संचालकांनी मध्यस्थी केल्याने त्यांना प्रवेश मिळाला.

अमेरिका आणि भारतात तारीख लिहिण्याच्या पद्धतीत थोडा फरक असल्याने व्हिसावरील तारीख चुकीची वाचली गेली आणि हा गोंधळ झाल्याचे केलॅनिक यांनी आज निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आयोजित केलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले. कांत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आपल्याला भारतात प्रवेश करता आला, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: When Uber CEO Travis Kalanick landed in India without a visa